रायगडावर फडकणार इचलकरंजीचा मानाचा भगवा ध्वज
इचलकरंजी - भगवा ध्वज इचलकरंजीतून नेण्याची परंपरा आजही कायम राहिली आहे. इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेच्यावतीने शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत विधीवत पूजन करुन ८५ मीटर उंचीचा भगवा ध्वज रायगडकडे रवाना करण्यात आला आहे. ध्वजपूजनावेळी विविध क्षेत्राातील मान्यवर, शिवप्रेमी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
गिरीभ्रमण संघटनेचे सदस्य आणि शिवभक्त भगवा ध्वज खांद्यावर घेऊन रायगडकडे रवाना झाले आहेत. पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या मिरवणुकीमुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते. नागरिकांनीही या मानाच्या ध्वजाला अभिवादन करत शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजी शहरातून सुमारे चार ते पाच हजार शिवभक्त रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत.