शिंगणापूरच्या नदीत सहा वर्षाचा मुलगा बुडाला...
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील पंचगंगा नदीत सहा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. मानस गणेश कांबळे असे त्याचे नाव आहे. आज सकाळी आठ वाजता नदीवर मानस आपल्या वडिलांसोबत पोहायला गेला असताना तो नदीत बुडाला. यावेळी घटनास्थळी आपत्ती पथकाने तातडीने धाव घेत मानसचा मृतदेह दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढला.