"मुंबईला परतण्यापूर्वीच काळाचा घाला; मुमेवाडी घाटात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत"
आजरा - मुमेवाडी घाटात दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.दीपक दत्तात्रय चांदे (वव 45), पत्नी शोभा (वव 33), मुलगा जय (वव 9), मुलगी पूर्वा (वव 6) अशी त्यांची नावे आहेत.
सुट्टीसाठी गावी आलेले हे कुटुंब मुंबईला परत जाण्यापूर्वी नातेवाईकांच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान काळाने घाला घालत हा भीषण अपघात घडला..
या हृदयद्रावक घटनेमुळे आजरा तालुक्यातील होण्याळी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.