सावित्रीबाई फुले रुग्णालयात बसविले डोनेशनमधून वॉटर फिल्टर
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील विविध विभागांमध्ये रुग्णांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डोनेशनमधून वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. किरण खतकर आणि आसिफ कुडचिकर यांच्या सहयोगातून ही सुविधा उपलब्ध झाली.
रुग्णालयातील डायग्नोस्टिक बिल्डिंगमधील सर्जिकल विभाग, मेडिसीन विभाग तसेच प्रसूती बिल्डिंगमधील बाल विभाग येथे हे वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. या सुविधेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी सोय झाली आहे.
या वॉटर फिल्टरचे उद्घाटन गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक फाळके, अमर समर्थ, प्रविण सोनवणे, प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, माजी नगरसेवक संभाजी देवणे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
डोनेशन स्वरूपात उपलब्ध झालेल्या या वॉटर फिल्टरमुळे रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली असून, यासाठी सर्वांचे आभार प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी यांनी मानले.