‘जातीसाठी मी माती खायला तयार’ : आ. प्रसाद लाड  

<p>‘जातीसाठी मी माती खायला तयार’ : आ. प्रसाद लाड  </p>

बीड – आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाकडून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली.
मनोज जरांगे यांनी 30 मे पासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. 

यावेळी माध्यमांशी बोलताना आ. प्रसाद लाड यांनी म्हटले आहे की,  "मी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. आमदार म्हणून आलो नाही. जरांगे माझे  भाऊ त्यांना थांबावं लागू नये म्हणून मी एक दिवस आधीच भेटीसाठी आलो. आमंत्रणाचा मान म्हणून चर्चेसाठी आलो. माझ्याविषयी असणारा द्वेष जरांगे यांनी दूर करावा," अशी विनंती लाड यांनी जरांगेंना केली.
"समाजाचे अडलेले विषय माझ्या माध्यमातून कसे दूर केले जाऊ शकतात, यासाठी इथे आलो आहे.  मला मागण्या सांगून मला काही वेळ द्यावा. त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. नाही पूर्ण झाल्या तर राजीनामा देईन. जातीसाठी मी माती खायला तयार आहे.

"एक कार्यकर्ता एवढा संघर्ष करतो मग मी त्यांच्या मागे का उभे राहू नये? लहान भाऊ आज त्यांना समजावून सांगायला आला आहे. मला संधी द्यावी त्यांनी! उपोषण करू नये. हत्ती गेला आता शेपूट राहीलं आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होतील," असा विश्वास आ.लाड यांनी जरांगे यांना दिला.