‘या’ महापालिकेच्या दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. धैर्यशील मानेंचे फोटो हटवले...कार्यकर्ते आक्रमक 

<p>‘या’ महापालिकेच्या दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. धैर्यशील मानेंचे फोटो हटवले...कार्यकर्ते आक्रमक </p>

इचलकरंजी –  इचलकरंजी महानगरपालिकेमधील  स्थायी समिती दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार धैर्यशील माने यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आपलाच नेता श्रेष्ठ हे दाखवण्याचे काम सध्या काही नगरसेवकांकडून केले जात आहे, महायुतीतील काही नगरसेवक स्वतःचे दालन असल्याचे समजून फोटो काढत आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांमधून होवू लागला आहे. या झालेल्या प्रकारामुळे भाजप नेते सुरेश हाळवणकर, आवाडे आणि शिंदे गटामध्ये सध्या धुसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येत आहे.