देशातील ‘या’ २४ दिग्गज नेत्यांच्या खासदारकीची मुदत संपणार... निवडणूक कार्यक्रम जाहीर

<p>देशातील ‘या’ २४ दिग्गज नेत्यांच्या खासदारकीची मुदत संपणार... निवडणूक कार्यक्रम जाहीर</p>

नवी दिल्ली – देशातील 10 राज्यांमधील 24 राज्यसभेतील सदस्यांची मुदत 21 जून ते 19 जुलै दरम्यान संपणार आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने २४ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी मतदान होईल. झारखंडमध्येही तीन जागांसाठी निवडणुका होणार आहे. तसेच मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये प्रत्येकी एका राज्यसभा जागेसाठी मतदान होणार आहे.

राज्यनिहाय 24 जागांची यादी

आंध्र प्रदेश (4 जागा)

• अयोध्या रामी रेड्डी अल्ला

• परिमल नाथवानी

• पिल्ली सुभाषचंद्र बोस

• सना सतीश बाबू

गुजरात (4 जागा)

• रामभाई हरजीभाई मोकारिया

• अमीन नरहरी हिराभाई

• गोहिल शक्तीसिंहजी हरिचंद्रसिंहजी

• रमिला बेचरभाई बारा

कर्नाटक (4 जागा)

• नारायण कोरगप्पा

• इराणा काडादी

• एचडी देवेगौडा

• मल्लिकार्जुन खर्गे

मध्य प्रदेश (3 जागा)

• जॉर्ज कुरियन

• दिग्विजय सिंग

• सुमेरसिंग सोळंकी

राजस्थान (3 जागा)

• नीरज डांगी

• राजेंद्र गेहलोत

• रवनीत सिंग

झारखंड (2 जागा)

• दीपक प्रकाश

• शिबू सोरेन (आसन रिक्त)

मणिपूर (1 जागा)

• महाराजा सनाजाओबा लेशेम्बा

मेघालय (1 जागा)

• वानवेरॉय खारलुखी

अरुणाचल प्रदेश (1 जागा)

• नाबाम रेबिया

मिझोराम (1 जागा)

• के. वनलालवेना