कॉक्रोच जनता पार्टी’च्या संस्थापकांना जीवे मारण्याची धमकी...

<p>कॉक्रोच जनता पार्टी’च्या संस्थापकांना जीवे मारण्याची धमकी...</p>

नवी दिल्ली - देशात सुरु असलेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरण यासह राजकीय पक्ष फोडाफोडीच्या प्रकारामुळे तरुण पिढी कंटाळली आहे. यात सरन्यायाधीशांनी बेरोजगारांवर केलेल्या वक्तव्यामुळे तरुण पिढी संतापली आहे. अशा वेळी निर्माण झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या एक्स हँडलला तरुणांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. असं असताना आता या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 
अभिजीत दिपके यांनी स्वतः सोशल मीडियावर “Receiving death threats now” असे लिहीत या संदर्भातील धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.