केंद्राकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला कात्री...; सर्वसामान्यांची चिंता वाढली 

<p>केंद्राकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला कात्री...; सर्वसामान्यांची चिंता वाढली </p>

नवी दिल्ली – आखाती युद्धाचा फटका प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थांना बसायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढल्याने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 9 सिलेंडर ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठी 300 रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. 
तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अनुदानिक गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे.