नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शाळांना लावावी लागणार झाडे ; केंद्राचा आदेश
महाराष्ट्रात ५३ लाखांहून अधिक झाडे लावण्याचा उद्दिष्ट
नवी दिल्ली – केंद्र सरकारने ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमासाठी केंद्राने सर्व राज्यांना झाडे लावण्याबाबत विशेष टार्गेट दिले आहे. त्यापैकी महाराष्ट्राला ५३ लाखांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळांना नव्या शैक्षणिक वर्षात किमान ५० झाडे लावावी लागणार आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत झाडे लावण्याचा कालावधी दिला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिला आहे.