देशातील परदेशी पर्यटकांच्या संख्येबाबत नीति आयोगाच्या माजी सीईओंनी व्यक्त केली चिंता 

<p>देशातील परदेशी पर्यटकांच्या संख्येबाबत नीति आयोगाच्या माजी सीईओंनी व्यक्त केली चिंता </p>

नवी दिल्ली - भारताने परदेशातील पर्यटन मार्केटिंग बजेटमध्ये मोठी कपात केली आहे त्यामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येवर वाईट परिणाम झाल्याची खंत  नीति आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. 
सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सच्या महसुलाचा फटका बसला आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या या काळात परकीय चलन मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी पर्यटन हा सर्वात जलद मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  गेल्या चार वर्षांत भारताचे परदेशी पर्यटन मार्केटिंग बजेट जवळपास शून्य करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.