सरकारने महागाई कमी करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

<p>सरकारने महागाई कमी करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी</p>

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सव्वीस जीवनावश्यक वस्तुंचे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिवसेंदिवस या महागाईत वाढच होत चाललीय. सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे वाढती महागाई कमी करावी आणि सरकारने शेतकऱ्यांना नियंत्रित दरात खत पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबुराव कदम, गीता कदम, वैशाली सुर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोहाळकर, दिलीपकुमार जाधव, संग्राम माने, प्रकाश शिंदे, रंगराव पाटील, मोहन पाटील, चंद्रकांत सुर्यवंशी, इकबाल शेख, सुभाष मोहिते, आनंद पोवाळकर आदी उपस्थित होते.