शक्तिपीठ महामार्ग विरोधी विराट मोर्चाला सुरुवात...

<p>शक्तिपीठ महामार्ग विरोधी विराट मोर्चाला सुरुवात...</p>

कोल्हापूर -  शेतकऱ्यांना भूमीहीन करुन त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज दसरा चौकातून सर्वपक्षीय विराट मोर्चाला सुरुवात झाली आहे.

आज सकाळपासून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. दसरा चौकातून हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जात आहे. यावेळी मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला सहभागी झाल्या आहेत. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत.

या मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती, विधानपरिषदेचे  गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, संपतबापू पवार -पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उदय नारकर, अतुल दिघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, गिरीष फोंडे, प्रकाश पाटील गोकुळचे संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील - चूयेकर,बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शिंदे गटाचे शिवसेनेचे सचिन विश्वास पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, जिल्हा बॅक संचालक सुधीर देसाई, बाबासो देवकर, गोपाळराव पाटील, जि प सदस्य एकनाथ पाटील, विश्वनाथ उर्फ हामु पाटील, राजेंद्र सूर्यवंशी,राहुल देसाई, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राष्ट्रवादी गटाचे जि प सदस्य मनोज फराकटे, विक्रांत पाटील किणीकर, संपत देसाई, सम्राट मोरे, सत्यजीत जाधव, पी डी घुंदरे, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर वाय पाटील, सर्जेराव देसाई,शिवाजी मगदूम,किशोर पाटील,बालाजी फराकटे, धीरज डोंगळे,रणधीर मोरे, डॉ. के. एन. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.