खुल्या बास्केटबॉल स्पर्धेत वारणेच्या मुलं आणि मुलींचे संघ अव्वल...

<p>खुल्या बास्केटबॉल स्पर्धेत वारणेच्या मुलं आणि मुलींचे संघ अव्वल...</p>

कोल्हापूर -  वारणा बास्केटबॉल क्लबच्यावतीने श्री ऑन श्री खुल्या मुला - मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुले आणि मुलींचे पस्तीस संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत मुलांच्या गटात वारणा बास्केटबॉल क्लबने विजेतेपद पटकावले तर एअरबॉलर्स संघ उपविजेता ठरला. मुलांच्या गटात तृतीय क्रमांक बी. ए. पी मिरज या संघाने पटकावला. मुलींच्या गटात वारणा बाजीगर्सने विजेतेपद पटकावले, तर वारणा हुपर्स आणि वारणा स्टॉर्मस या संघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांच्या गटातील बेस्ट रिबाऊंडर आकाश कोळी, बेस्ट शुटर साद मुल्ला, बेस्ट प्लेअर सुमित जाधव, आणि मुलींच्या गटातील बेस्ट रिबाऊंडर- दीपाली खांबे, बेस्ट शुटर तनिष्का जगताप, बेस्ट प्लेअर सानिका फुले यांच्यासह पुद्दुचेरी येथे  झालेल्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षला पाटील आणि अनुष्का जमदाडे यांनाही गौरवण्यात आले आहे.

या विजेत्या संघाना ईशानीताई कोरे, माजी प्राचार्य एस. एन. खाडे, प्रा. के. जी. जाधव वारणा भगिनी मंडळाच्या सदस्या शारदा महाजन यांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय खेळाडू उदय जाधव, उदय पाटील, रोहित घेवारी, संग्राम दळवी आदींनी परिश्रम घेतले.