जाधववाडीतून २१ वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
कोल्हापूर : शहरातील जाधववाडी परिसरातून कार्तीक उत्तम पवार (वय २१) हा युवक बेपत्ता झाला असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्तीक पवार हा १५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जाधववाडी येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो अद्याप परत आलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कार्तीक पवार हा अंगाने मध्यम, रंगाने सावळा, उंची अंदाजे पाच फूट पाच इंच, केस काळे, डोळे काळे असून तो मराठी भाषा बोलतो. बेपत्ता होताना त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या युवकाबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.