शिवसेनेकडून वाचाळवीर मंत्र्यांना मिळणार दणका...
मुंबई – वाचाळवीर आणि कामात प्रगती नसणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारातून शिंदेच्या शिवसेनेकडून डच्चू दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अनेक आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असे म्हटले होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे यामध्ये कामात कसूर आणि वाचाळवीर मंत्र्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून दणका दिला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.