‘...पण माझ्यासोबत असं याआधी कधी झालं नव्हतं’ : मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेतील ‘त्या’ महिला पत्रकाराचे अकाउंट निलंबित... 

<p>‘...पण माझ्यासोबत असं याआधी कधी झालं नव्हतं’ : मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेतील ‘त्या’ महिला पत्रकाराचे अकाउंट निलंबित... </p>

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे देशाच्या दौऱ्यावर गेले होते यावेळी मोदी पत्रकार परिषदेतून बाहेर पडत असताना नॉर्वेच्या  पत्रकार हेल लिंग यांनी, “जगातील सर्वात मुक्त प्रसारमाध्यमांपैकी एक असलेल्या देशाच्या पत्रकारांचे प्रश्न का घेत नाही?”, असा प्रश्न त्यांनी पंतप्रधान मोदींना विचारला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या प्रश्नानंतर  नॉर्वेतील पत्रकार हेल लिंग यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे त्यामुळे त्यांना भारतीय लोकांशी संवाद साधता येत नाहीय.  याबाबत त्यांनी, आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचे ट्वीट सांगितले आहे. 
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, प्रेस फ्रीडमसाठी ही छोटी किंमत आहे. पण माझ्यासोबत असं याआधी कधी झालं नव्हतं, माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक भारतीयांना उत्तर द्यायचं होतं. पण आता उत्तरं उशिरा मिळतील. माझी अकाउंट्स पुन्हा सुरू होतील, अशी आशा आहे” असं  म्हणत त्यांनी सस्पेन्शन नोटीसचाही स्क्रीनशॉट शेअर केला आहे.