पुण्यातील मोटेगावकर क्लासच्या इमारतीला मनपाने लावले टाळे...
पुणे – नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. राज्यात मोटेगावकर क्लासेसच्या अनेक शाखा आहेत. या शाखांमध्ये या प्रकरणामुळे शुकशुकाट पसरला आहे. अशात पुणे महापालिकेने पुण्यातील मोटेगावकर क्लासला टाळे ठोकले आहे.
पुण्यातील मोटेगावकर क्लास गेल्या चार वर्षांपासून भोगवटा पत्र नसलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे या इमारतीवर ३ कोटी २० लाखांचा मिळकत कर लावला असून ही इमारत सील करण्यात आली आहे.