…आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट वाटत आहेत : खा. राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
नवी दिल्ली – देशाच्या जनतेला काटकसरीचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर गेले आहेत. यावर उलट – सुलट चर्चा सुरु असताना पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेटचा पुडा गिफ्ट दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
“देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे हसत आहेत आणि रिल्स बनवत आहेत, त्यावर भाजपा टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.