इचलकरंजी महापौर आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यात शाब्दिक वाद...
इचलकरंजी – इचलकरंजी महापालिकेच्या सभेत एका प्रश्नांवर बोलताना महापौर आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यात शाब्दिक वाद झाली आहे.
महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक संजय तेलनाडे यांनी बायोमायनिंगच्या बारा कोटी रुपयांच्या ठेक्या संदर्भात सभागृहात विचारणा केली. यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाली. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौर हुकुमशाही पध्दतीने काम करत आहे, असा आरोप करत सभात्याग केला.