औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी पहा एका क्लिकवर... 

<p>औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी पहा एका क्लिकवर... </p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने उद्या बुधवारी अखिल भारतीय केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी पुकारलेल्या या एकदिवसीय बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर बंदच्या कालावधीत रुग्णांच्या अत्यावश्यक आणि तातडीच्या उपचारासाठी औषधे उपलब्ध व्हावीत तसेच औषधाअभावी कोणत्याही रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन, कार्यालयात एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.  नागरिकांनी औषधांबाबत सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहायक आयुक्त (औषधे)- संपर्क क्रमांक  0231-2641091 व मोबाईल क्रमांक - 9028866959
तसेच बंदच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी व संबंधितांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे -
ऑफिस- 0231-2650128, 9423570128, प्रल्हाद खवरे (हातकणंगले)- 9881011110, किरण जाधव (पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी) – 9423282526, संदिप मिसाळ (आजरा, चंदगड, गडहिंग्लज)- 9922230677, मोहन ढेरे (राधानगरी, भुदरगड, कागल)- 9545344399, सचिन पाटील (शिरोळ)- 9890151673, संतोष पाटील- (इचलकरंजी)- 8329525559, आदित्य चौगुले (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 9923456559, सुरेश काटकर (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 9545737474, दिपक वाडकर (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 7709344343 या ठिकाणी गरजूंनी संपर्क साधावा.