गोकुळ प्रशासक नियुक्तीवर सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर नाही : पुढील सुनावणी १० जूनला

<p>गोकुळ प्रशासक नियुक्तीवर सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर नाही : पुढील सुनावणी १० जूनला</p>

कोल्हापूर -  तीन मे रोजी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर राज्य शासनाने तातडीने प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार माजी संचालकांसह राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील  स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेच्यावतीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र अद्याप राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्किट बेंचमध्ये आज सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी १० जूनला होणार आहे.