'कॉकरोच इज बॅक' : अभिजीत दीपके यांनी सुरु केलं नवीन हँडल

<p>'कॉकरोच इज बॅक' : अभिजीत दीपके यांनी सुरु केलं नवीन हँडल</p>

छत्रपती संभाजीनगर – देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, देशातील बेरोजगार तरुणांवर केलेल्या वक्तव्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ या एक्स हँडलला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणावरून कॉकरोज जनता पार्टीचे एक्स हँडल ब्लॉक केले आहे. 
या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे कि, "अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचे खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे." त्यानंतर दोन तासांच्या आत त्याने 'कॉकरोच इज बॅक' (Cockroach Is Back) या नावाने नवीन हँडल सुरु करत लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले.  याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि  तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पाठिंबा दिला आहे.