कोल्हापूर शहरात पाणी कपातीवरून अस्वस्थता; जुनी पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्याची मागणी

<p>कोल्हापूर शहरात पाणी कपातीवरून अस्वस्थता; जुनी पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्याची मागणी</p>

कोल्हापूर : हवामानातील बदल आणि पावसाळा उशिरा सुरू होण्याच्या अंदाजामुळे कोल्हापूर महापालिकेने १ मे २०२६ पासून शहर व परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पाणी कपात कमी करण्यासाठी जुनी पाणीपुरवठा योजना कायम कार्यान्वित ठेवावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर यांनी केलीय. मागणीचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी विजय राठोड, आणि आयुक्त राजेंद्र भारूड यांना पाठवलंय.

दरम्यान,  हवामानातील बदल व हवामान खात्याच्या पावसाळा उशिरा सुरू होण्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी, सध्या उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महापालिकेमार्फत दि. १ मे २०२६ पासून शहर व परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी पावसाचे प्रमाण कमी असतानाही उपलब्ध पाणीस्रोतांचा विचार करता कोल्हापूर शहरात पिण्याच्या व इतर वापरासाठी इतक्या प्रमाणात टंचाई कधी जाणवली नव्हती. सध्या काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे प्रत्यक्षात पाण्याची उपलब्धता पूर्वीपेक्षा वाढलेली असताना पाणी कपात होणे ही बाब नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे. यापूर्वी असोसिएशनच्या माध्यमातूनही असे सूचित करण्यात आले होते की, थेट पाईपलाईन योजना सुरू असली तरी शहरातील जुनी पाणीपुरवठा यंत्रणा,पंपिंग स्टेशन व पाइप नेटवर्क यांची योग्य देखभाल व दुरुस्ती करून ती कार्यान्वित स्थितीत ठेवावी. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा थेट पाईपलाईनमध्ये अडचण निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तिचा उपयोग होऊ शकतो. सध्याच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर या पर्यायी व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिक व विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच उपलब्ध पाणीस्रोतांचा प्रभावी वापर करून शहरातील पाणीटंचाई टाळावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर यांनी केलीय. मागणीचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी विजय राठोड, आणि आयुक्त राजेंद्र भारूड यांना पाठवलं आहे.

यापूर्वी कमी पावसाच्या काळातही कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई जाणवली नव्हती. सध्या काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढलेली असतानाही कपात केली जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.