तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक... दोन दिवसांची पोलीस कोठडी

<p>तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक... दोन दिवसांची पोलीस कोठडी</p>

कोल्हापूर – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिडीत तरुणीची फैयाज शेख याच्याशी ओळख झाली होती. जुलै 2022 ते एप्रिल 2026 या कालावधीत त्याने पीडित तरुणीच्या ओळखीचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवले. शेखने महाद्वार रोड आणि कळंबा कात्यायनी परिसरातील लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात फैयाज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी फैयाज शेख याला आज अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोर अधिक तपास करत आहेत.