३ इडियट्सचा सिक्वेल, आमिर खानचं प्रेक्षकांना सरप्राईज 

<p>३ इडियट्सचा सिक्वेल, आमिर खानचं प्रेक्षकांना सरप्राईज </p>

कोल्हापूर - ३ इडियट्स या चित्रपटाबद्दल आपण अनेकदा चर्चा ऐकल्या आहेत. बॉलिवूडमधील अत्यंत चांगला आणि हिट ठरलेला  चित्रपट म्हणून याकडे पाहिलं जातं. ३ इडियट्सच्या सिक्वेलची अनेकांना उत्सुकता होती आणि ती प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच ३ इडियट्सचा सिक्वेल येतोय. एका मुलाखतीदरम्यान, अभिनेता आमिर खानने या सिक्वेलबद्दल खुलासा केलाय. या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केलीय. तर कथानक हे राजू हिरानी यांचं असणार आहे.. ही एक आगळीवेगळी आणि  विनोदी कथा  असणार आहे.या सिक्वेलची खास बाब म्हणजे या चित्रपटाची कथा ही १० वर्षांनी पुढे सरकणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित २००९ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सांस्कृतिक क्रांती घडवली होती . चेतन भगतच्या five points someone या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांचा ताण यावर भाष्य केलं होत. त्यामुळं ३ इडियट्स २ पुन्हा एकदा त्याच यशाची पुनरावृत्ती करेल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.