चांदोली धरण क्षेत्रात भूकंपाचा धक्का... 

<p>चांदोली धरण क्षेत्रात भूकंपाचा धक्का... </p>

सांगली – चांदोली धरण क्षेत्रातील वारणावती परिसरात आज अतिसौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी  2.9 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद झाली आहे. 
भूकंपाचा केंद्रबिंदू  वारणावती भूकंप केंद्रापासून  17.6 किलोमीटर इतक्या अंतरावर होता. सदरच्या भूकंपाचे स्वरूप हे अतिसौम्य असल्याचे वारणा पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.