उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी ‘या’ बड्या नेत्याच्या नावाची घोषणा
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते खा. संजय राऊत यांनी ट्वीट करून विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.