मस्साजोग सरपंच निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीला धक्का...
बीड – आज राज्यात अनेक ठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकींचा निकाल लागला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचाही निकाल लागला आहे. या निकालात संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण राजकीय हत्येमुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु स्वरुपानंद देशमुख हे शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नाही आणि आज अखेर निकाल हाती आला आहे.
या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे. पहिल्या फेरीपासूनच स्वरुपानंद देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्यांमध्ये स्वरुपानंद देशमुख आघाडीवर होते. अखेर त्यांनी 92 मतांनी विजय प्राप्त केला आहे.