इचलकरंजीत कापड गाठी विकून सव्वा नऊ लाखांची फसवणूक… 

तरुणावर गुन्हा दाखल

<p>इचलकरंजीत कापड गाठी विकून सव्वा नऊ लाखांची फसवणूक… </p>

इचलकरंजी – इचलकरंजीत कापड गाठी विकून सव्वा नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या फसवणूक प्रकरणी  तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या नितु कॅरिअर्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमध्ये कापड गाठींची देखरेख करण्याची जबाबदारी इरफान इसाक मोमीन याच्याकडे होती. जुलै ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोमिन याने गोडाऊनमधील २८ कापड गाठी म्हणजेचे तब्बल ९ लाख २५ हजार रुपयांचा माल परस्पर हैदर नावाच्या इसमाला विकला. यानंतर मालक शंकर भवरसिंह शेखावत यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोमीन याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.