पदासाठी युती करणारा मी नाही : पत्रकार परिषदेत बच्चू कडूंचे वक्तव्य
मुंबई – शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरु होती. तसेच विधान परिषदेवर जायचं असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहितीही समोर आली होती. यावर खुलासा करत बच्चू कडू यांनी, ‘पदासाठी युती करणारा मी नाही’, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले आहे.
बच्चू कडू यांनी म्हटले आहे कि, मुद्यांसाठी युती करणारे आम्ही आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही, फॉर्म माझ्या बॅगेत आहे, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. 1 लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, माझा कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलिनिकरणाची चर्चा बघितली आणि वाईट वाटले, असे त्यांनी म्हटले आहे.