दोन अल्पवयीन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार...आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

<p>दोन अल्पवयीन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार...आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा</p>

कोल्हापूर - वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पंकज सावळा घोलप याने ऑगस्ट २०२१ मध्ये दोन अल्पवयीन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केला होता. घोलप हा पीडित मुलींच्या जवळच्या नात्यातील आहे. यातील एका पीडितेने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर २५ जुलै २०२२ रोजी वडगाव पोलीस ठाण्यात घोलप विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात ११ साक्षीदार तपासले तसेच परिस्थितीजन्य पुरावे तपासल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी पंकज घोलप याला वीस वर्षाच्या सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या प्रकरणाचा तपास वडगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अर्चना पाटील, पैरवी अधिकारी विशाल पाटील आदींनी केला आहे.