सरंपच निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडली विजयाची माळ
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी, चांदे, दुर्गमानवड, कौलव, शेळेवाडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यावेळी कांबळवाडी सरपंचपदी जयदीप पाटील यांची, चांदे सरपंचपदी वैष्णवी प्रदिप खाडे, दुर्गमानवड सरपंचपदी मंदिरा रवींद्र कांबळे, शेळेवाडी सरपंचपदी जयश्री सर्जेराव पाटील, कौलव सरपंचपदी एकनाथ कुंभार आदींच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
यामध्ये जयदीप पाटील यांचा 10 मतांनी विजयी झाला आहे. तसेच वैष्णवी खाडे यांचा 74, रवींद्र कांबळे यांचा 60, जयश्री पाटील यांचा 308 मतांनी तर एकनाथ कुंभार यांचा 165 मतांनी विजयी झाला आहे.