शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू : बच्चू कडूंचे विधान 
 

अखेर बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार..! 

<p>शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू : बच्चू कडूंचे विधान <br />
 </p>

मुंबई – आज बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत असल्याचे घोषित केले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितले कि, “शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल-परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारले आहेत. हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींचा मुद्दा, दिव्यांगाच्या मंत्रालयाचं बळकटीकरण हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय मी घेत आहे. मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं. पण त्याच्या बळकटीकरणासाठी काम झालं पाहिजे” 

 “प्रहार सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार आहे. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात राहील. ज्यांना राजकीय काम करायचंय ते शिवसेनेत येतील आणि ज्यांना सामाजिक काम करायचंय ते प्रहार संघटनेत राहतील. आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल यासाठी काम करणार आहे. पण रक्तातला प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावेल, तितकाच शेतकरी मजूर दिव्यांगांसाठी धावणार आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.