इचलकरंजीत किरकोळ कारणावरून मारहाण...पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल...
इचलकरंजी - इचलकरंजी शहरात किरकोळ कारणावरून मारहाण झाली आहे. या मारहाण प्रकरणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल झाले आहे.
प्रसाद प्रभाकर दामले हे त्यांच्या भावाच्या घरातून बाहेर पडत असताना सुरज राजाराम बेलेकर याने त्यांच्या ट्रकचा फोटो काढल्याचा गैरसमज करून घेत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत होत बेलेकर यांनी तुला ठार मारतो, अशी धमकी देऊन दामले यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत दामले यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून, या प्रकरणी दामले यांनी गावभाग पोलिस ठाण्यात सुरज बेलेकर याच्याविरोधात तक्रार दिली आहे. दुपारच्या सुमारास शहरातील आझाद चित्रपट गृहाजवळ सुरज बेलेकर याचे आयकॉन १७ नावाने जिम आहे. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहन पार्किंगसाठी प्रसाद दामले आणि महेश भागवत यांनी संगनमत करून त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची खंडणी मागत फोटो काढले आणि वाद निर्माण केला. तसेच पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी झालेल्या वादातून प्रसाद दामले आणि महेश भागवत यांनी शिवीगाळ करत बेलेकर यांच्या डोक्यावर काठीने मारहाण केली आहे. त्यानंतर बेलेकर यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.