संकेश्वरजवळ टेम्पो आणि मोटारीचा अपघात...

<p>संकेश्वरजवळ टेम्पो आणि मोटारीचा अपघात...</p>

इचलकरंजी - शहरातून आज टेम्पो ट्रॅव्हलमधून चौदा जण गडहिंग्लजवळील शिंदेवाडी येथे  एका लग्नकार्यासाठी निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वरजवळ टेम्पो ट्रॅव्हल आणि मोटारीची धडक झाली. या धडकेत काही जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.