विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध..?

<p>विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध..?</p>

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी तर एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. परंतु ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 

त्यानुसार  भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे परंतु  त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या  अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

भाजपकडून विधान परिषदेसाठी  उमेदवार - 

1. सुनील कर्जतकर 

2. माधवी नाईक 

3. संजय भेंडे

4. विवेक कोल्हे

5. प्रमोद जठार

6. प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदे गटाकडून - 

1. नीलम गोऱ्हे

2. बच्चू कडू

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून - 

- झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गटाकडून - 

महाविकास आघाडी-

अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)