नानीबाई चिखलीत अजब प्रकार : महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक
कोल्हापूर – कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे अजब प्रकार घडला आहे. बंधाऱ्याजवळ असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
झालेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. अशी अघोरी पूजा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज सकाळी मंदिरात नेहमीप्रमाणे पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्याच्या आणि भाविकांच्या हा प्रकार नजरेस आला. यावेळी नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.