बड्या नेत्याच्या मुलाचा पर्दाफाश, कोल्हापुरात भूकंप होणार'; इंगवले यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

<p>बड्या नेत्याच्या मुलाचा पर्दाफाश, कोल्हापुरात भूकंप होणार'; इंगवले यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ</p>

कोल्हापूर - लवकरच एका बड्या नेत्याच्या मुलाचा पत्रकार परिषदेतून पर्दाफाश करणार असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट)चे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला आहे. विशेष म्हणजे, या पोस्टखाली 'कोल्हापुरात भूकंप होणार' असे कॅप्शन देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

इंगवले यांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या एका आमदारांच्या मुलाबाबतच हा इशारा आहे का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, पोस्टमध्ये कोणाचेही नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले नसल्याने नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आता इंगवले पत्रकार परिषदेत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.