आपटेनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी...
आ.सतेज पाटील यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यावतीने आपटे नगर येथे अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक राहुल माने, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, प्रकाश पाटील, नंदकुमार पिसे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबुराव बोडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.