"चूक यंत्रणेची, मग त्याची शिक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना का?" : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा टीईटी परीक्षेबाबत राज्य सरकारला सवाल
नवी दिल्ली – राज्यात टीईटी पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. परीक्षा रद्द होवून कित्येक दिवस उलटले तरी अद्याप परीक्षेची नवीन तारीख न आल्याने सहा लाख उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, "चूक यंत्रणेची, मग त्याची शिक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना का?" असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे.
ट्वीट मध्ये खा.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रात TET चा पेपर लीक झाला, परीक्षा रद्द झाली. 6 लाख उमेदवार अडचणीत आले. दोन आठवडे झाले, तरी नवी तारीख जाहीर झालेली नाही. लीक करणारे मोकाट, सिस्टम निर्दोष आणि शिक्षा भोगत आहे तो, ज्याने प्रामाणिकपणे मेहनत केली. हे या देशाचे विद्यमान आणि भावी शिक्षक आहेत, ज्यांच्या हाती भारताचे भविष्य आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केली, फॉर्म भरले, फी दिली, दूरदूरच्या केंद्रांवर गेले आणि आता फक्त वाट पाहत आहेत, बिना तारखेची, बिना उत्तराची, अशी टीका त्यांनी केली आहे.