सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप ; नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही : प्रफुल्ल पटेल

<p>सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप ; नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही : प्रफुल्ल पटेल</p>

मुंबई – सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेतला आहे. 

यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फारमहत्व देण्याचे कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे, असे म्हटले आहे.