खळबळजनक ; उद्धव ठाकरे पक्षाकडून बंडखोर खासदारांना पत्र
मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी, सहा बंडखोर खासदारांना पत्र पाठवले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.
पाठवलेल्या पत्रात राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद 4 चा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच विलीनीकरण हे केवळ विधिमंडळातील गटाचे नसून मूळ राजकीय पक्षाचे असते, मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वाने अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत, असेही म्हटले आहे.
खासदारांना विलीनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो. मात्र विलीनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नसतो, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सहा खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असे पक्षाने पत्रात स्पष्ट म्हटले आहे त्यामुळे बंडखोर खासदारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.