तुकाराम मुंढेंची करडी नजर आता शाळेच्या कँटीनवर... 

<p>तुकाराम मुंढेंची करडी नजर आता शाळेच्या कँटीनवर... </p>

मुंबई – राज्यातील शाळांमधील पोषण आहारावर तसेच उपहारगृह आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर अन्न व औषध विभागाची करडी नजर असणार आहे. त्या अनुषंगाने अन्न व औषध विभागाकडून शाळांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशाने राज्यभर ही कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शाळांमधील स्वयंपाकघर, कँटीन, अन्न साठवणूक व्यवस्था, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.