17 व्या दिवशीही सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच...; प्रकृती अधिकच खालावली

<p>17 व्या दिवशीही सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच...; प्रकृती अधिकच खालावली</p>

नवी दिल्ली - शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 17 वा दिवस आहे. या उपोषणामुळे त्याची प्रकृती अधिक खालावली आहे.  त्यामुळे चिंता वाढली आहे.  
उपोषण सुरू झाल्यापासून सोनम वांगचुक यांचे सुमारे 8.25 किलो वजन घटले आहे. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही 70 mg/dL पेक्षाही खाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना सतत चक्कर येणे, स्नायूंची झपाट्याने झीज होणे आणि शरीरात अशक्तपणा जाणवत असल्याचेही वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.  
इतक्या सर्व गोष्टी घडत असताना या उपोषणाकडे मोदी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या वांगचुक यांची प्रकृती खूप खालावत चालली असली तरी ते आपल्या उपोषणाच्या मुद्यावर ठाम आहे.