सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा : उद्धव ठाकरे 

<p>सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा : उद्धव ठाकरे </p>

मुंबई - सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे सरकार बघत नाही हे खूप दुर्देवी आहे. सरकार अतिशय असंवेदनशील झाले आहे, त्यांच्या आंदोलनाला आमच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले आहे.

अशा आंदोलनावेळी  सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, सोनम वांगचुक यांची बुद्धिमत्ता देशासाठी वापरली पाहिजे ते करण्याऐवजी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे  आता हिंदूंनी झोपून चालणार नाही त्यांना जागायला हवं, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी काही दिवसांपूर्वी सोनम वांगचूक यांना फोन करुन यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तुम्ही प्राणांतिक उपोषण करु नका, या सरकारला काही देणेघेणे पडलेले नाही, असे त्यांना सांगितले, 'पण ते म्हणाले,मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए.' अशा व्यक्तीसमोर काय बोलायचे. या विरोधात 20 तारखेला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला देशातील सर्व खासदारांनी उपस्थित रहावे. माणुसकी शिल्लक असेल तर भाजपमधील खासदारांनीही आंदोलनाला आले पाहिजे. हा देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.