जेजुरीत वारकऱ्यांचा भीषण अपघात ; तीन महिलांचा मृत्यू तर 16 वारकरी जखमी
पुणे – आज सकाळी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा जेजुरीत मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे तर 16 वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ज्या ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.