राज्यातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा झटका...
मुंबई – राज्यात लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून पडताळणीच्या नावावर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा पायंडा राज्य सरकारने सुरु केला आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना झटक्यांवर झटके बसू लागले आहेत. या योजनेतून आतापर्यंत ९२ लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. पडताळणी प्रक्रियेनंतर दर दहापैकी सुमारे चार लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. असे एकूण ९२ लाखांहून अधिक महिलांची नावे या योजनेच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.