आता काळ बदललाय ; शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात अपमानित करू नये : सर्वोच्च न्यायालय
कोल्हापूर - एका विदयार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात प्राध्यापकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील डी एस नायडू यांनी विदयार्थ्याचा कथित अपमान हा आत्महत्येच्या जवळपास महिनाभर आधी झाला होता. त्यामुळे त्या घटनेला आत्महत्येचे थेट कारण मानता येत नाही, असा युक्तीवाद केला. तसेच त्यांनी विदयार्थ्याच्या मृत्यु पूर्वी सुमारे एक तास आधी घडलेली मानसिक तणाव वाढल्याची दुसरा घटनाही न्यायालयाला सांगितली. विदयार्थ्याच्या हितासाठी काही वेळा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. अशा प्रत्येक घटनेत फौजदारी कारवाई झाल्यास शिस्त राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर त्याचा वितरित परिणाम होऊ शकतो, असे या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र यावर न्यायमूर्ती संदीत मेहता यांनी या युक्तीवादावर टिप्पणी करताना काळ बदलला आहे, आमच्या काळात शिक्षकांकडून मार किंवा कठोर वागणूक सामान्य मानली जात होती पण आता परिस्थिती बदलल्याचे सांगितले.
एखाद्या विदयार्थ्याचा वर्गात इतर विदयार्थ्यासमोर अपमान केल्यास त्याचा मानसिकतेवर खोल परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचा स्पष्ट संदेश समाजात जाणे गरचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विदयार्थ्यांशी सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागणे ही काळाची गरज असल्याचेही न्यायालयाने सांगितले. तसेच विदयार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे महत्व आणि शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि विदयार्थ्यांचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.