पाकिस्तानस्थित गँगस्टरशी संपर्क प्रकरणी हिंदू एकता आंदोलनचे पोलिस अधिक्षकांना निवेदन

 

<p>पाकिस्तानस्थित गँगस्टरशी संपर्क प्रकरणी हिंदू एकता आंदोलनचे पोलिस अधिक्षकांना निवेदन</p>

<p> </p>

कोल्हापूर -  पाकिस्तानस्थित गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगलीतील काही तरुणांची एटीएस आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली.

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या अथवा अशा कारवायांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तपासाची गोपनीयता राखत नागरिकांमध्ये संभ्रम आणि अफवा पसरू नयेत. यासाठी वेळोवेळी अधिकृत माहिती जाहीर करावी, संशयास्पद सोशल मीडिया नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि देशविरोधी कारवायांना सहाय्य करणाऱ्या घटकांचा सखोल तपास करण्याबरोबरच संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढवावी, आदि मागण्यांचे निवेदन पोलिस अधिक्षक निलोत्पल यांना सादर करण्यात आले.

 यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, शहर अध्यक्ष विलास मोहिते, आनंदराव कवडे, हिंदुराव शेळके, बाबू साखळकर, कुमार शिंदे, सुधाकर वडगावकर, विशाल पाटील, बाबासो शिंदे, सचिन बिरंजे, योगेश केरकर, केदार मुनेश्वर, प्रदीप मोहिते, अजित तोडकर, कुमार काटकर, विजय भोपळे, बाबू बनपट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.